मुंबई : भारतात पारंपरिक सामाजिक चौकटींमध्ये पुरुषांकडून नेहमीच कणखरतेची अपेक्षा केली जाते. “पुरुष रडत नाहीत”, “भावनांवर नियंत्रण ठेवण हेच पुरुषार्थ”, अशा अनेक सामाजिक समजुतींच्या विळख्यात अडकलेल्या पुरुषांच्या मानसिक आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होत. विशेषतः वैवाहिक नात्यांतील तणावामुळे पुरुषांमध्ये नैराश्य वाढत असल्याच चित्र अलीकडच्या काळात विविध अहवालांतून समोर आल आहे. पत्नीच्या वागणुकीतील भावनिक त्रास, अपमान, सतत टीका, गप्प राहून शिक्षा देण किंवा दुर्लक्ष यामुळे पुरुष मनोबल खचत जात, आत्मसन्मान ढासळतो परिणामी हे नैराश्यात रूपांतरित होताना दिसून येत आहे.

अखिल भारतीय मानसोपचार संस्था आणि इंडियन सायकायट्रिक सोसायटी यांच्या २०२२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संयुक्त अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत पुरुषांमध्ये पत्नीच्या भावनिक वागणुकीमुळे उद्भवणाऱ्या नैराश्याच्या प्रमाणात २५ टक्के वाढ झाली आहे. या अहवालानुसार, मुद्दाम गप्प राहून पतीला दूर लोटणे,सतत तक्रारी व अपमान, तसेच पतीच्या भावनांना चुकीच ठरवण, अशा वागणुकीमुळे अनेक पुरुष मानसिक आजाराच्या गर्तेत अडकतात. या पार्श्वभूमीवर ‘मेन वेलफेअर ट्रस्ट आणि सेव्ह इंडिया फॅमिली फाऊंडेशन या संस्थांनी २०२४ मध्ये सरकारकडे पुरुषांसाठी स्वतंत्र समुपदेशन केंद्र स्थापन करण्याची मागणी केली होती. या संस्थांच्या आकडेवारीनुसार फक्त दिल्ली क्षेत्रात दरवर्षी २० हजाराहून अधिक पुरुष त्यांच्या हेल्पलाइनवर संपर्क करतात आणि त्यातील ७० टक्क्यांहून अधिक तक्रारी पत्नीच्या वागणुकीमुळे उद्भवणाऱ्या मानसिक तणावासंदर्भात असतात.

भारतामध्ये ‘घरेलू हिंसाचार अधिनियम २००५’ फक्त महिलांना संरक्षण देतो. पुरुषांवर होणारा मानसिक, भावनिक वा आर्थिक छळ अजूनही कायद्यात स्पष्टपणे नमूद नाही. त्यामुळे पुरुष न्याय मिळवण्यासाठी कुठल्या कायद्याखाली तक्रार करावी हेही ठरलेले नाही. कोर्टात गेलेल्या अनेक प्रकरणांमध्ये पुरुषांच्या तक्रारींना फारसं गांभीर्याने घेतलं गेलं नाही, असं निरीक्षण ‘मेन राईट मुव्हमेंट’च्या कार्यकर्त्यांनी नोंदवल आहे.या विषयावर कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार, सध्या भारतात एकही सरकारी पुरुष समुपदेशन केंद्र अस्तित्वात नाही. दिल्ली एनसीआर, पुणे, बंगळुरू यांसारख्या शहरांत केवळ काही खाजगी संस्थांनी पुरुषांसाठी हेल्पलाइन सुरू केल्या आहेत, पण त्या पुरेशा नाहीत.

वैवाहिक तणावातून आत्महत्या

दरम्यान, राष्ट्रीय गुन्हे नोंद (एनसीआरबी) २०२३ च्या अहवालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्यांपैकी तब्बल ७१.८ टक्के आत्महत्या पुरुषांनी केल्या असून त्यातील २५ टक्के आत्महत्यांमागे वैवाहिक तणाव प्रमुख कारण ठरले आहे. अनेक पुरुषांनी मृत्यूपूर्व चिठ्ठ्यांमध्ये पत्नीच्या मानसिक त्रासाचा उल्लेख केल्याचही समोर आल आहे. तरीदेखील पुरुषांवरील वैवाहिक छळाकडे ना कायदा, ना समाज गंभीरतेने पाहतो आहे.राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ नुसार भारतातील १८ वर्षांवरील पुरुषांपैकी सुमारे २.७ टक्के पुरुष नैराश्यग्रस्त आहेत, मात्र हे प्रमाण वास्तवात अधिक असण्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त करतात. कारण बरेच पुरुष मानसिक समस्या असल्याच मान्य करत नाहीत आणि त्यामुळे वैद्यकीय मदतीपासून दूर राहतात.

बहुतेक प्रकरणात पुरुष नैराश्यात जात असतानाही ते स्वीकारत नाहीत. भावनिक कमकुवतपणा दाखवण म्हणजे कमजोरी, असा समज असल्यामुळे बरेच पुरुष गप्प राहतात. पण हीच शांतता अंतःकरणात खोल नैराश्य तयार करत असते असे मुंबईतील मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. उपचारासाठी आलेल्या १०० पुरुष रुग्णांपैकी किमान ४० रुग्णांनी पत्नीच्या वागणुकीमुळे वैवाहिक जीवनात ताण निर्माण झाल्याची कबुली दिली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत दोघांनीही नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करण आवश्यक असत. पतीही माणूस आहे, त्याच्याही भावना आहेत, मानसिक आरोग्य आहे, हे मान्य करण्याची वेळ आली आहे.