मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपाल आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

राज्यपाल कोश्यारी हे गुरुवारपासून तीन दिवस नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

पालकमंत्र्यांचा बहिष्कार ;अधिकाऱ्यांच्या बैठका राज्यपाल घेणार

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा पूर्वनियोजित मराठवाड्याचा तीन दिवसांचा दौरा उद्या, गुरुवारपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात तिन्ही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तर तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री या वेळी उपस्थित राहणार नाहीत.

राज्यपाल कोश्यारी हे गुरुवारपासून तीन दिवस नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत  आढावा घेणार आहेत. यालाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. याबाबत मंत्रिमंडळाची नापसंती राज्यपालांना कळविण्यात आली. करोना, पूर परिस्थिती आदी सर्व महत्वाचे विषय राज्य सरकार योग्यपणे हाताळत असताना राज्यपाल बैठका का घेत आहेत, असा सवाल अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी घेतला होता. दोन सत्ता केंद्रे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आक्षेपही मंत्रिमंडळाने घेतला होता. मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्र मानुसारच होईल, असे राजभवनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

राज्यपाल किं वा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने उपस्थित राहणे हे संके त असतात. वर्धा जिल्हा दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री रणजित कांबळे अनुपस्थित राहिल्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कांबळे यांचे पालकमंत्रीपदावरून तात्काळ  हकालपट्टी के ली होती. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांच्या दौऱ्याच्या वेळी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण व परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहणार नाहीत.

हिंगोलीतही पालकमंत्री उपस्थित राहणार नसल्याचे समजते. गेल्या आठवड्यात राज्यपाल रपूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले असता उदय सामंत व आदिती तटकरे हे अनुक्र मे रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री उपस्थित होते.

राजभवनच्या वतीने राज्यपालांच्या दौऱ्याचा सुधारित कार्यक्र म प्रसिद्धीस देण्यात आला. त्यात नांदेड, परभणी आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांबरोबर बैठकांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने आक्षेप घेतला तरीही राज्यपाल स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठकांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर कु रघोडी करण्याची चिन्हे आहेत. राज्यपालांकडून स्थानिक अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यासच आक्षेप असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

काँग्रेसची टीका

मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावरून मंत्रिमंडळात व बाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कॉंग्रेसचे नेतेही सरसावले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल म्हणून नव्हे तर भाजपचे नेते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी  काम करत असल्याची टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी  केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Despite the objections of the cabinet governor visit marathwada from today akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या