तारण मालमत्तांबाबत माहिती मिळणे सुलभ

महारेराच्या या निर्णयामुळे ग्राहकांना घरावर कर्ज किं वा तारण आहे की नाही हे समजणार आहे.

महारेराला ‘सीईआरएसएआय’ची कागदपत्रे सादर करणे विकासकांना बंधनकारक

मुंबई : महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातील घरांवर किं वा मालमत्तेवर कर्ज घेतले असल्यास वा घरे तसेच मालमत्ता तारण ठेवली असल्यास त्याबाबतचे सीईआरएसएआयची (सेंट्रल रजिस्ट्री सिक्युरिटायजेशन अ‍ॅसेट रिकंस्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट ऑफ इंडिया) कागदपत्रे महारेराला सादर करणे आता विकासकांना बंधनकारक असणार आहे. महारेराच्या या निर्णयामुळे ग्राहकांना घरावर कर्ज किं वा तारण आहे की नाही हे समजणार आहे. तर याअनुषंगाने ग्राहकांची होणारी फसवणूकही आता रोखली जाणार आहे. महारेराकडे नोंदणी करताना विकासकांना आपल्या गृहप्रकल्पावर कर्ज घेतले आहे का, प्रकल्पातील घरे तारण ठेवली आहेत का याची माहिती द्यावी लागते. ग्राहकांच्या संरक्षणासाठी, त्यांची फसवणूक रोखण्यासाठी ही माहिती विकासकांकडून घेतली जाते. एका घोषणापत्राअंतर्गत विकासक ही माहिती महारेराकडे सादर करतात; पण माहिती अधिकृत आहे की नाही याची काही खात्री नसते. एकार्थाने विकासक लेखी माहिती देतात. त्यामुळे माहिती खरी आहे की खोटी हे समजत नाही आणि मग कर्ज वा तारण असलेले घर खरेदी केल्यास ग्राहकांना त्याचा फटका बसतो. ग्राहकांची फसवणूक होते. ही बाब लक्षात घेता आता महारेराने विकासकांकडून अधिकृत माहिती मिळावी यासाठी सीईआरएसएआयकडील कागदपत्रे सादर करणे विकासकांना  बंधनकारक केले असल्याची माहितीमहारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Developers are required to submit cersai documents to maharera zws

ताज्या बातम्या