मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात अधिवेशनादरम्यान सत्तेत सहभागी होण्याच्या ‘ऑफर’बाबत मिश्किल चर्चा रंगली होती. त्यावरून सभागृहाबाहेरदेखील दावे-प्रतिदावे झाले. पण शनिवारी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस व आदित्य ठाकरे यांच्यात भेट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. हे दोन्ही नेते बीकेसीतील सोफिटेल हॉटेलमध्ये एकाचवेळी उपस्थित होते. त्यामुळे त्यांची भेट झाल्याचे दावे केले जात असून त्यात नेमकी काय चर्चा झाली असावी, याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत.

या भेटीची चर्चा का होऊ शकते?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती. “उद्धवजी तुम्हाला २०२९ पर्यंत काही स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा स्कोप आहे. आपण ते वेगळ्या पद्धतीने बोलू. ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे”, असे देवेंद्र फडणवीस थेट उद्धव ठाकरेंना ऑफर देत म्हटले होते.
फडणवीसांच्या या ऑफरवर बोलताना उद्धव यांनी म्हटले की, सभागृहात या गोष्टी खेळीमेळीत झाल्यात आणि तशाच व्हायला हव्यात.” त्यावेळी ‘ऑफर दिली, स्वागताला आलो’, असं मिश्किलपणे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्‍यांना म्हटले होते.
याआधीही विधानपरिषदेच्या दालनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. त्यावर बोलताना “कुणी कुणाला भेटले म्हणजे युतीसाठी भेटले असं होत नाही”, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.