VIDEO: मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था म्हणजे 'बाहेर एसी आणि आतमध्ये देशी' - देवेंद्र फडणवीस | Devendra Fadnavis comment on Mumbai AC Toilet situation | Loksatta

VIDEO: मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था म्हणजे ‘बाहेर एसी आणि आतमध्ये देशी’ – देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील स्वच्छतागृहांविषयी बोलताना त्यांची अवस्था ‘बाहेर एसी आणि आतमध्ये देशी’ अशी असल्याचं मत व्यक्त केलं.

VIDEO: मुंबईतील स्वच्छतागृहांची अवस्था म्हणजे ‘बाहेर एसी आणि आतमध्ये देशी’ – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील स्वच्छतागृहांविषयी बोलताना त्यांची अवस्था ‘बाहेर एसी आणि आतमध्ये देशी’ अशी असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच ही अवस्था बदलण्यासाठी ‘डेडिकेटेड टीम’ ठेवली जाईल. ती टीम ही स्वच्छतागृह २४x७ साफ ठेवेल, असंही त्यांनी नमूद केलं. ते शनिवारी (१० डिसेंबर) बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे २० हजार स्वच्छतागृहांच्या (टॉयलेट्स) सीट्स नव्याने तयार केल्या जात आहेत किंवा मोठ्या प्रमाणात दुरुस्त केल्या जात आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी एसी टॉयलेट आहेत, पण एसी टॉयलेट्समधील आधील अवस्था खराब आहे. म्हणजे ‘बाहेर एसी आणि आतमध्ये देशी’ अशी अवस्था आहे. ही अवस्था बदलली पाहिजे.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंकडे ब्रह्मास्त्रापेक्षा जास्त प्रभावी अस्त्र आहे, ते म्हणजे…”, निकालानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर

“देशी चांगलंच असतं, देशी वाईट नसतं, पण ही अवस्था बदलण्यासाठी ‘डेडिकेटेड टीम’ ठेवली जाईल. ती टीम ही स्वच्छतागृह २४x७ साफ ठेवेल. या स्वच्छतेची यंत्रणा ‘सेंट्रली मॉनिटर’ केली जाईल. महानगरपालिका अशी एक संपूर्ण यंत्रणाच तयार करते आहे. त्यामुळे नवीन स्वच्छतागृहंही तयार होतील,” असंही देवेंद्र फडणीसांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 13:45 IST
Next Story
मुंबईः अश्लील चित्रफीतीच्या माध्यमातून महिलेची बदनामी करणाऱ्याला अटक; प्रियकराविरोधातही गुन्हा दाखल