गरिबी आणि असहाय्यतेचा फायदा उचलून एका डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बोरीवलीत उघडकीस आली आहे. डॉ. योगेंद्र शुक्ला असे या डॉक्टरचे नाव आहे. त्याच्याच क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या मदतनीसाच्या लहान बहिणीवर त्याने बलात्कार केला. कस्तुरबा पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली आहे.
 योगेंद्र शुक्ला (३१) हा दंतवैद्य काशिमीरा येथे राहतो. त्याची पत्नीही डॉक्टर आहे. बोरिवलीच्या राजेंद्र नगर भागात त्याचे शुक्ला क्लिनिक आहे. त्याच्या क्लिनिक मध्ये काम करणाऱ्या मदनीस तरुणीच्या कुटुंबियांशी शुक्लाने घरगुती संबंध प्रस्थापित केले होते. ही मदतीनस आई आणि लहान बहिणीसह रहाते. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखिची असल्याने शुक्ला त्यांना आर्थिक मदत करत असे आणि तिच्या पंधरा वर्षीय बहिणीचा शालेय खर्च उचलत असे. यामुळे त्यांच्या घरात शुक्लाची ‘देव माणूस’ म्हणून प्रतिमा तयार झाली होती. पण शुक्लाचा त्यामागचा उद्देश वेगळा होता. नोव्हेंबर महिन्यात शुक्ला या मदतीसाच्या घरी गेला आणि तिच्या अल्पवयीन लहान बहिणीला फिरायला जाण्याच्या निमित्ताने बाहेर नेले. त्याने या मुलीला गोराई येथे आणले आणि तेथील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर कोणाला न सांगण्याची धमकी दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor arrested in rape case
First published on: 12-12-2014 at 05:06 IST