मुंबई : निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने खबरदारीची पावले उचलली आहेत. राज्य सरकारने एसटी बसवर ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ या जाहिराती लावल्या होत्या. या जाहिरातीसह इतर राजकीय जाहिराती तत्काळ हटवण्याच्या सूचना एसटी महामंडळाने संबंधित विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत.

एसटी महामंडळातील दुरावस्थेत असलेल्या बसवर राज्य सरकारने लावलेल्या ‘निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ ही जाहिरात लावली होती.  एसटी बस, बस स्थानक, आगारात व विविध आस्थापनावर अधिकृत / अनधिकृतपणे राजकीय जाहिराती लावल्या आहेत. आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून राजकीय जाहिराती काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे.

mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Maharashtra Government, Freezes, Ready Reckoner Rates, for 2024 - 2025,lok sabha 2024, elections, house buyers, land, maharashtra, marathi news,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेडीरेकनर दर ‘जैसे थे’
Chhagan Bhujbal and anjali damania
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळ पुन्हा अडचणीत? अंजली दमानिया यांच्या पाठपुराव्याला यश, नेमकं प्रकरण काय?

हेही वाचा >>>एम.एफ हुसैनसह प्रसिद्ध चित्रकारांच्या प्रतिकृती विकून कोट्यावधींची फसवणूक; हवाला नेटवर्कच्या माध्यमातून मनी लाँडरींग

एसटी बसवर जाहिरात करणारे परवानाधारक ‘मे. प्रोॲक्टिव इन आऊट ॲड प्रा. लि.’ यांच्या मार्फत बसवरील राजकीय जाहिराती काढून टाकण्यात येत आहेत. परंतु, सर्व आगारात या जाहिरातदारांचे मनुष्यबळ नसल्याने, एसटी महामंडळाला स्वतः पुढाकार घेऊन जाहिराती हटवाव्या लागणार आहेत. जाहिरात काढण्यासंदर्भातील खर्चाची रक्कम संबंधित परवानाधारक जाहिरातदारांकडून वसूल केली जाणार आहेत.

राजकीय जाहिराती काढण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई

एसटी महामंडळातील संबंधित आगारातील बसवरील राजकीय जाहिरात संबंधित आगारातील अधिकारी-कर्मचारी काढतील, असा भ्रम करून दुसऱ्या आगारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याने त्याकडे दुर्लक्ष करून, राजकीय जाहिरात काढण्यास टाळाटाळ केल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी प्रत्येक स्तरावरून घेण्यात यावी, अशा सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.