मध्य रेल्वेने पायाभूत देखभालीची कामे हाती घेतली असून वेगाने कामे केली जात आहेत. मध्य रेल्वेच्या वांगणी- नेरळ डाऊन मार्गावर ५ मार्च ते १ एप्रिलपर्यंत रात्री १.३० ते पहाटे ४.३० दरम्यान रेल्वे देखभालसंबंधित कामे करण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, दोन अप आणि डाऊन लोकलच्या फेऱ्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग : इगतपुरी – आमणे टप्प्याचे ७९ टक्के काम पूर्ण, सर्वात कठीण आणि आव्हानात्मक कामाचा समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२४ वाजता सुटणारी शेवटची कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल. तर, कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल बदलापूर येथून चालविण्यात येईल. या दोन फेऱ्या अंशतः रद्द केल्याने कर्जतसह वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी येथील प्रवाशांचे हाल होणार आहेत. कार्यालयीन कामासाठी पहिल्या लोकलने येणाऱ्या प्रवाशांची आणि शेवटच्या कर्जत लोकलने कर्जतकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.