लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बँक फसवणुकीप्रकरणी मुंबईतील १२ ठिकाणी छापे टाकले. मे. मंधाना इंडस्ट्रीज व इतरांशी संबंधित ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले. शोध मोहिमेमुळे पाच कोटी रुपयांचे शेअर्स आणि सिक्युरिटीज गोठवण्यात आले. तसेच बँक खाती आणि लॉकर्स गोठवण्यात आले. या कारवाईत वाहने आणि महागडी घड्याळे जप्त करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-मुंबई : आईस्क्रीममधील बोटाचा तुकडा कामगाराचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंधाना इंडस्ट्रीज, पुरुषोत्तम मंधाना, मनीष मंधाना, बिहारीलाल मंधाना आणि इतरांविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी चौकशी करत आहे. बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्त्वाखाली बँक समुहाची ९७५ कोटी रुपयांची फसणूक केल्याची तक्रार होती. गुन्ह्यांतील रक्कम इतरत्र वळवण्यात आल्याचा आरोप आहे. शोध मोहिमेमुळे अनेक मालमत्तेच्या दस्तऐवजांसह कागदपत्रे सापडली आहेत. या कारवाईत १४० हून अधिक बँक खाती, ५ लॉकर्स आणि पाच कोटींच्या ठेवी गोठवण्यात आल्या आहेत. मर्सडीज, लेक्सस सारख्या महागड्या गाड्या तसेच रोलेक्स, हब्लॉटसह अनेक महागडी घड्याळे ईडीने जप्त केली आहेत.