बेकायदेशीर ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणुकदारांची सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छोट्या पडद्यावरील मालिकांमधील कलाकार क्रिस्टल डिसूझा आणि अभिनेता करण वाही यांचे जबाब नोंदवले. या दोघांनी ऑक्टाएफएक्स नावाच्या ॲपच्या जाहिरातींसाठी काही रक्कम घेतली होती. अभिनेत्री आणि मॉडेल निया शर्मा हिलासुद्धा ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> दक्षिण मुंबईत वाहतुकीत मोठे बदल, वाचा….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ॲप आणि त्याच्या प्रवर्तकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आधारे ईडी याप्रकरणात तपास करीत आहे. ऑक्टाएफएक्स ॲप आणि वेबसाईट फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये व्यवहार करण्यासाठी आरबीआयकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. तरीसुद्धा, प्लॅटफॉर्मचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करण्यात आला. विदेशी मुद्रा व्यापार सुलभ करण्याच्या नावाखाली गुंतवणुकदारांना ऑक्टाएफएक्स ट्रेडिंग ॲप आणि वेबसाईटवर विविध भारतीय बँकांची मोठ्या प्रमाणात खाती दाखवली जात होती. यात मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आला होता.