ज्येष्ठ पत्रकार व ‘साप्ताहिक विवेक’ ‘तरुण भारतचे’ माजी संपादक चित्तरंजन द. पंडित यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते. त्याचबरोबर त्यांनी पाच वष्रे सा. विवेकच्या संपादकपदाची धुरा वाहिली होती. १९६१ ते ८१ या प्रदीर्घ काळात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. १९८१ साली ‘मुंबई तरुण भारत’च्या संपादकपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी ‘तरुण भारत’च्या मुंबई, पुणे व सोलापूर या आवृत्त्यांचे संपादक म्हणून काम पाहिले. स्वातंत्र्यसनिक सी.व्ही. वारद यांचे चरित्र चित्तरंजन पंडित यांनी लिहिले होते. त्याचप्रमाणे ‘सा. विवेक’मधील ’स्पष्ट बोलतो माफ करा’ व ‘तरुण भारत’मधील ’मोरपीस’, ’दशा आणि दिशा’ हे सदरलेखन खूप गाजले होते. पत्रकारिता करीत असतानाच अखिल भारतीय मजदूर संघ, भारतीय कुष्ठनिवारक संघ, विश्व िहदू परिषद या संस्थांसाठी त्यांनी काम केले होते.