जी. टी. रुग्णालयाजवळील बेस्टच्या उपकेद्रात बिघाड झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयासह अनेक इमारती अंधारात बुडाल्या होत्या. विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे सुमारे अर्धा तास पालिका कर्मचारी अंधारातच बसून होते. तर काहीजण उद्वाहनांमध्ये अडकून पडले होते. विद्युतपुरवठा जनरेटरद्वारे सुरू करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. परंतु मुख्यालयातील अंधार जनरेटर दूर करू शकला नाही.
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. मंगळवारी दुपारी ४.१० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला़ बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेऊन, ४.३६ मिनिटांनी विद्युतपुरवठा सुरळीत केला़
संग्रहित लेख, दिनांक 11th Jul 2013 रोजी प्रकाशित
पालिका मुख्यालयाची बत्ती गुल!
जी. टी. रुग्णालयाजवळील बेस्टच्या उपकेद्रात बिघाड झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयासह अनेक इमारती अंधारात बुडाल्या होत्या. विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे सुमारे अर्धा तास पालिका कर्मचारी अंधारातच बसून होते. तर काहीजण उद्वाहनांमध्ये अडकून पडले होते. विद्युतपुरवठा जनरेटरद्वारे सुरू करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. परंतु मुख्यालयातील अंधार जनरेटर दूर करू शकला नाही.
First published on: 11-07-2013 at 02:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity shortage in mumbai corporation