चार इंग्रजी आणि एका हिंदी चित्रपटाने सुरूवात

मुंबई: राज्यभरातील चित्रपटगृहे आजपासून कार्यान्वित होणार आहेत. करोनासंदर्भातील सगळे नियम पाळून अर्ध्या क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर एकपडदा आणि बहुपडदा चित्रपटगृहांनी कं बर कसली आहे. दिवाळी आणि पाठोपाठ येणाऱ्या डिसेंबर या दोन महिन्यात प्रदर्शित होऊ पाहणाऱ्या मोठया चित्रपटांच्या जोरावर चांगला व्यवसाय होण्याची शक्यता लक्षात घेत आठवडाभर आधीच चित्रपटगृहांची नव्याने सुरूवात होत आहे. चार इंग्रजी चित्रपट आणि एक हिंदी चित्रपट प्रदर्शित करत गेले सात महिने बंद असलेली चित्रपटगृहे प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहेत.

देशभरात अनेक राज्यातून गेले दोन महिने बहुपडदा चित्रपटगृहे कार्यान्वित झाली आहेत, मात्र चित्रपटांच्या एकू ण व्यवसायापैकी ४० टक्के  उत्पन्न हे मुंबई – महाराष्ट्रातून येते. त्यामुळे पीव्हीआर, आयनॉक्स, कार्निव्हल सिनेमासारख्या मोठया समूहांनी चित्रपटगृह सुरू करण्यासाठी जोरदार तयारी के ली आहे. पीव्हीआरच्या राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असून राज्य सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करण्यात येणार असल्याची खात्री कं पनीने दिली आहे. शुक्रवारपासून ‘वेनम – लेट देअर बी कार्नेज’, ‘नो टाईम टू डाय’, ‘द लास्ट ड्यूल’ आणि  ‘ड्युन’ असे चार इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर अभिनेता प्रतीक गांधी याचे पदार्पण असलेला ‘भवाई’ हा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना आपले लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे तसेच सामाजिक अंतर पाळत एक सोडून एक प्रेक्षक अशी आसनव्यवस्था चित्रपटगृहात राहील, अशी माहिती कार्निव्हल सिनेमाच्या सूत्रांनी दिली.

‘राज्य सरकारच्या घालून दिलेल्या नियमांप्रमाणे आवश्यक मुखपट्टी, तापमान तपासणी, ई – तिकीट, स्मार्ट कार्डचा वापर आणि वातानुकूलित स्वच्छ हवा अशा सर्व बाबींची बारीक काळजी घेणार आहोत. प्रेक्षकांचा वावर स्पर्श विरहीत असावा म्हणून कागदी तिकिटांपेक्षा आम्ही ई-तिकिटांवर भर देत आहोत. सिनेमाच्या आधी काउंटरवर देखील ई – तिकिटांची सोय असेल,’ अशी माहिती आयनॉक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक टंडन यांनी दिली. चित्रपटगृहे सुरू होणार असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आयनॉक्सने राज्यभरातील आपल्या चित्रपटगृहांमध्ये २२ ऑक्टोबरचे सकाळी ९ ते १० या वेळेतील शो विनामूल्य दाखवण्यात येणार असल्याची घोषणा के ली आहे. ही सुविधा फक्त आयनॉक्सचे संके तस्थळ वा अ‍ॅपवरून के ल्या जाणाऱ्या बुकिं गपुरतीच उपलब्ध असणार आहे. तर ‘कालपर्यंत आमच्या बैठका सुरू होत्या, नियमांनुसार आम्ही तयारी के ली आहे. दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच चित्रपटगृहात प्रवेश करायची परवानगी असेल. सभागृह, शौचालय, फूड कोर्ट आणि प्रवेशद्वार विशेष स्वच्छ ठेवले जातील’, अशी माहिती ‘मराठा मंदिर’चे व्यवस्थापक मनोज पांडे यांनी दिली. मुंबईतील अनेक एकपडदा चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरऐवजी पुढच्या आठवड्यात २९ ऑक्टोबरपासून किं वा ऐन दिवाळीत सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती काही चित्रपटगृहांच्या व्यवस्थापकांनी दिली.

तिसऱ्या घंटेचा खणखणाट… कठोर निर्बंधामुळे गेले सात महिने नाटकावर पडलेला पडदा आज दूर होणार आहे. राज्य शासनाने २२ ऑक्टोबरला नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देताच नाट्यसृष्टीतील हालचालींना वेग आला होता. नाट्यगृहांमध्ये दुरुस्तीकामे तातडीने उरकण्यात आली. स्वच्छता, झाडलोट आणि इतर सर्व आवश्यक यंत्रणांसह नाट्यगृह सज्ज झाली आहेत. व्यावसायिक नाटकांची सुरुवात प्रशांत दामले यांच्या नाटकाने होणार असून २३ तारखेपासून त्यांचा डोंबिवली,पुणे, बोरिवली, पार्ले असा दौरा सुरू होणार आहे. तर प्रयोगिक रंगभूमीवरही प्रयोगांना सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये अतुल पेठे यांच्या ‘शब्दांची रोजनिशी’या नाटकाचा आजचा पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाला आहे. याशिवाय लावणी, सांगीतिक मैफली, परंपरा दर्शन आदी कार्यक्रमांच्याही तारखा जाहीर झाल्या आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर नाट्यगृह आणि सभागृह सुरू झाले असल्याने अनेक ठिकाणी दिवाळी पहाट आणि इतर कार्यक्रमांच्या नियोजनालाही वेग आला आहे.