अभियंता इस्थर अनुह्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच आरोपी अटकेत असेल असे कुर्ला पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून इस्थरचा खुनी तिच्या ओळखीतलाच कोणतरी जवळचाच आहे आणि तोच व्यक्ती तिच्या सोबतही त्या दिवशी होता. मिळालल्या सीसीटीव्ही फुटेजवरून त्या व्यक्तीची ओळख पटली आहे. त्याचा शोध सुरू असून एक पथक या प्रकरणी हैदराबादला रवाना झाले असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून ५ जानेवारी रोजी इस्टार अनुह्या (२३) ही तरूणी बेपत्ता झाली होती. ११ दिवसानंतर तिचा मृततेह कांजूर महामार्गाजवळील झुडपात सापडला होता. घटनास्थळी पोलिसांना एक चादर सापडली. त्यावर रक्ताचे डाग होते