अद्ययावत सुविधा देणे राहिले दूर, उलट आरोग्याची प्राथमिक व्यवस्था असणारे केंद्रही अन्यत्र हलवून गैरसोय करणाऱ्या शासनाच्या निर्णयाविरूद्ध न्यायालयीन लढा देत अखेर आदिवासींनी आपला हक्क मिळविला आहे. शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोरोशी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वीत झाले.
सहा वर्षांपूर्वी मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र किशोर गावात हलविण्यात येऊन या परिसरातील २८ गावे शिरोशी आणि धसई प्राथमिक आरोग्य केंद्रांना जोडण्यात आली. मात्र उपरोक्त दोन्ही आरोग्य केंद्र दूरवर असल्याने येथील आदिवासींची गौरसोय होत होती. मोरोशीपासून धसई गांव तर ३९ किलोमीटर अंतरावर आहे. श्रमिक मुक्ती संघटनेने या अन्यायाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने शासनास मोरोशी येथे तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे आदेश दिल़े
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2014 रोजी प्रकाशित
अखेर आदिवासींनी आरोग्य केंद्र मिळविले
अद्ययावत सुविधा देणे राहिले दूर, उलट आरोग्याची प्राथमिक व्यवस्था असणारे केंद्रही अन्यत्र हलवून गैरसोय करणाऱ्या शासनाच्या निर्णयाविरूद्ध
First published on: 26-01-2014 at 03:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eventually tribal gets health center