मुंबई : घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूस याच्या कथित कोठडी मृत्यूप्रकरणी माफीचा साक्षीदार होऊ देण्याची मागणी करणारा अर्ज बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी सोमवारी विशेष न्यायालयात केला. वाझे यांच्यासह चार पोलिसांवर या प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात आपल्याला कधीही अटक करण्यात आलेली नाही, असा दावा करून वाझे यांनी माफीचा साक्षीदार होऊ देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >>> सचिन तेंडुलकरच्या डीप फेक चित्रफीत फिलिपिन्समधून अपलोड; ई-मेल कंपनीशी सायबर पोलिसांनी साधला संपर्क

Ravi Kishan DNA test,
रवी किशन यांच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयाने फेटाळली
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी

या कथित कोठडी मृत्यू प्रकरणात आपला सहभाग असल्याचे किंवा युनुसच्या मृतदेहाची ओळख पटल्याचे पोलिसांनी कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे. या प्रकरणी माफीचा साक्षीदार म्हणून आपले म्हणणे नोंदवून घ्यावे, अशी विनंती वाझे यांनी न्यायालयाकडे केली आहे. तसेच, या प्रकरणातील गुन्ह्याशी संबंधित तथ्ये उघड करण्याचे म्हटले आहे. गेल्या २० वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असून त्याचा आपल्याला त्रास सहन करावा लागत आहे. हा केवळ कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापरच नाही, तर त्यामुळे आपल्या उपजीविकेसह समाजातील प्रतिमा आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचत आहे, असा दावाही वाझे यांनी केला आहे. या प्रकरणाचा महत्त्वाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असून त्याचा निकाल नजीकच्या काळात येण्याची शक्यता नाही. त्याचप्रमाणे, नजीकच्या काळात हा खटला पुन्हा सुरू होईल असेही नाही आणि खटला निकाली निघण्यास बरीच वर्षे लागतील, असा दावा वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची मागणी करताना केला आहे. आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्या वेदना अंतहीन आहेत, असेही वाझे यांनी अर्जात म्हटले आहे.