अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना काल अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली. त्यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना नऊ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. एनसीबीकडून त्यांची चौकशी करण्यात येईल.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. अटकेच्या या कारवाईनंतर सुशांतच्या कुटुंबीयांचे वकिल विकास सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Mumbai’s Esplanade Court sends Showik Chakraborty and Samuel Miranda to NCB custody till 9th September https://t.co/Jkkwv1QIFa
— ANI (@ANI) September 5, 2020
“एनसीबीने अटकेची कारवाई केली. त्यातून मुंबई पोलीस मोठं काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, ही कुटुंबीयांना वाटणारी भीती बरोबर होती, हे सिद्ध झाले आहे. या प्रकरणात वेगवेगळे अँगल आहेत. वेगवेगळया अंगाने तपास होऊन, आणखी माहिती समोर येईल अशी सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांना अपेक्षा आहे” असे विकास सिंह म्हणाले.
Arrests by NCB prove the fear of the family that there was something very big that Mumbai Police wanted to hide. Clearly, there are several angles in this case. The family (of Sushant Singh Rajput) hopes that more angles will come out: Vikas Singh, lawyer of Rajput’s family pic.twitter.com/v89Ysd2TCj
— ANI (@ANI) September 5, 2020
दरम्यान अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला घेऊन कोर्टात पोहोचले आहेत. कोर्टात आणण्याआधी शोविक, सॅम्युअल यांना सायन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.
Mumbai: Showik Chakraborty, Samuel Miranda, Zaid and Kaizen Ibrahim brought to Sion Hospital for medical examination https://t.co/P2KCwd8EPD pic.twitter.com/aepoHZi5b4
— ANI (@ANI) September 5, 2020
शोविक आणि सॅम्युअलच्या अटकेमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविकनंतर एनसीबी रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.
शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमलीपदार्थाच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. दोघांच्या अटकेला एनसीबीचे उपसंचालक के पीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.
