व्हिसासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या मुलाविरूद्ध कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फराज मलिक असे नवाब मलिक यांच्या मुलाचे नाव असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. नवाब मलिक यांचा मोठा मुलगा फराज मलिकने काही दिवसांपूर्वी त्याची मैत्रीण लॉरा हैमलीन हिच्या व्हिसासाठी काही बनावट कागदपत्र सादर केली होती.

हेही वाचा >>> मुंबई : म्हाडाच्या बाळकुम गृहप्रकल्पातील घरांच्या किंमतीत १६ लाखांची वाढ, पात्र विजेत्यांची न्यायालयात धाव

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
thane police issued tadipaar notice to sharad pawar faction ncp ex corporator mahesh
ठाणे: शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकावर तडीपारीची टांगती तलवार
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?

यामध्ये विवाह प्रमाणपत्राचाही समावेश आहे. याबाबत कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. फराज मलिक आणि हैमलीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.