लालबागमध्ये इमारतीला भीषण आग, महापौर किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “समयसूचकता दाखवली असती तर…”

लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे.

लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग लेव्हल तीनची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी महापौरांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. यानंतर या घटनेबद्दल बोलताना पेडणेकर म्हणाल्या, ही आग कशामुळे लागली याबद्दल नक्की काही कळलं नाही. तो व्यक्ती ज्यावेळी इमारतीला लटकत होता, तेव्हा थोडी समयसूचकता दाखवली असती, तो पडू नये याची काळजी घेतली असती तर त्याचा जीव वाचला असता. ही व्यक्ती या इमारतीतलाच एक कामगार होता.

हेही वाचा – लालबागमधील ‘वन अविघ्न पार्क’ला भीषण आग; १९ व्या मजल्यावरुन पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता चित्रपटगृहासमोर आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्यानंतर काहींनी खाली उड्या मारल्याची दृष्यही समोर आल्याचं एबीपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचंही दिसून आलं आहे.

पडलेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक आमदार अजय चौधरींनी ही प्राथमिक माहिती दिली आहे. पाचव्या माळ्यावर आग लागल्यानंतर ती पसरली आणि १९ व्या माळ्यापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fire at lalbuag building in mumbai one avighna apartment vsk

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या