मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील अविअर कॉर्पोरेट पार्क या व्यावसायिक इमारतीला मंगळवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या विविध मजल्यावर अडकलेल्या ४० ते ५० जणांची सुटका करण्यात आली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

मुलुंड पश्चिमेकडे एलबीएस मार्गावरील एका व्यावसायिक इमारतीत अचानक आग लागली. सहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. एकूण १००० चौरस मीटर जागेत ही आग पसरली होती. विद्युत यंत्रणा, विद्युत वाहिन्या, वातानुकूलित यंत्रणा, लाकडी सामान, कागदपत्रे या आगीत जळून खाक झाली आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचा ताफा दाखल आहे. आग विझवण्याचे प्रयत्न अद्याप सुरू असून कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.