अग्निशमन दलातील अग्निशामक पदाच्या भरतीसाठी शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्तीला आरक्षण लागू होणार नाही असा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. या भरतीमध्ये अपंगांसाठी ३७ पदे आरक्षित आहेत. त्यामुळे शासनाच्या मंजुरीसापेक्ष एकूण पदांपैकी ३७ पदे रिक्त ठेवण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>आदेश बांदेकर अध्यक्ष असलेल्या सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये साजूक तुपाचा घोटाळा? ‘महिन्याभरात चौकशी पूर्ण करणार’, फडणवीसांची घोषणा!

मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक पदाच्या भरतीसाठी बहुप्रतिक्षित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल ९१० पदांसाठी ही महाभरती होणार आहे. या भरतीमध्ये जात प्रवर्गाबरोबरच समांतर आरक्षणही लागू आहे. यामध्ये माजी सैनिकांसाठी १५ टक्के, खेळाडूंसाठी ५ टक्के, प्रकल्पबधितांसाठी ५ टक्के, भूकंपग्रस्तांसाठी २ टक्के, महिलांसाठी ३० टक्के आरक्षण राज्य सरकारच्या निर्देशानुसार लागू करण्यात आले आहे. तसेच अनाथांसाठी १ टक्के आरक्षण, तर अपंगांसाठी ४ टक्के पदे याप्रमाणे ३७ पदे आरक्षित आहेत.

हेही वाचा >>>भीमा- कोरेगाव अभिवादन शांततेत पार पाडण्याचे आंबेडकरी संघटनांचे आवाहन; करणी सेनेवर कारवाईची मागणी

अग्निशमन दल अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे सर्व पदांच्या निकषानुसार उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे अग्निशामक पदावर सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अपंगांना आरक्षण लागू होणार नाही, असा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. शासनाच्या या प्रस्तावावरील निर्णयासापेक्ष अपंगांसाठी राखीव जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत. खुल्या प्रवर्गासाठी ४४३ जागा असून त्यातून ही पदे रिक्त ठेवण्यात येणार आहेत.या भरतीमध्ये अनाथांसाठी एक टक्का याप्रमाणे ९ पदे आरक्षित आहेत. भरतीअंतर्गत पात्र अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास ही ९ पदेही खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण आरक्षणातून रिक्त ठेवण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire brigade recruitment 37 vacancies reserved for firefighter post recruitment for disabled mumbai print news amy
First published on: 31-12-2022 at 12:01 IST