शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस आणि केबल व्यावसायिक श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिघांना आरे सब पोलिसांनी अटक केली आहे. एक महिन्यापूर्वी शिंदे यांनी केलेल्या मारहाणीचा वचपा घेण्यासाठी हा गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
मोटारसायकलच्या क्रमांकावरून त्याचा मालक सुमित तळेकर (२२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानेच या गुन्ह्यासाठी मोटारसायक पुरविल्याचे निष्पन्न झाले. तो बेरोजगार आहे. सुमितने दिलेल्या माहितीवरून जुगल दोडिया (२६) आणि योगेश कोकणे या दोघांना अटक करण्यात आली. योगेशचा जोगेश्वरीत केबल व्यवसाय आहे. त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी रिव्हॉल्वरही जप्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 26th May 2015 रोजी प्रकाशित
राजू शिंदे गोळीबार प्रकरणी तिघांना अटक
शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस आणि केबल व्यावसायिक श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिघांना आरे सब पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 26-05-2015 at 02:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing at filmcity close to amitabh bachchan shoot site