मुंबईच्या चेंबूर भागातील एका अनाथ आश्रमातून १७ ते २० डिसेंबर दरम्यान १३ ते १७ वयोगटातील पाच मुले बेपत्ता असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या मुलांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुलांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – मुंबई पालिकेकडे लसींचा तुटवडा? कोविशिल्ड, कोर्बावॅक्सचे डोस संपले; कोवॅक्सिनच्या फक्त ६००० मात्रा शिल्लक!

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चेंबूरच्या एका अनाथाश्रातून १७ डिसेंबर रोजी १३ आणि १४ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. तसेच १८ डिसेंबर रोजी आणखी १५ आणि १७ वर्षांचा, तर २० डिसेंबर रोजी १४ वर्षांचा एक मुलगा बेपत्ता झाला. मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडल्यानंतर हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. संबंधित अनाथ आश्रम जिल्हा महिला बाल विभागांतर्गत चालवण्यात येत असून येथे १२ ते १८ वयोगटातील अनाथ मुलांचे संगोपन करण्यात येते.

हेही वाचा – करोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पोलिसांकडून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येत असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत असल्याची माहिती चेंबूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सुर्यवंशी यांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचेही ते म्हणाले.