प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. हवाई सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात ‘नो फ्लाय झोन’ घोषित केला आहे.

हेही वाचा – मुंबई: मध्य रेल्वेवर १५ डबा लोकलच्या अतिरिक्त फेऱ्यांना खिळ

हेही वाचा – मुंबई : स्वराज्यभूमीवरील लोकमान्य टिळकांच्या समाधीस्थळी नामफलक बसविण्यात दिरंगाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईवर हवाई हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संभाव्य हल्ला लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी २६ जानेवारीला शिवाजी पार्क परिसरात ड्रोन, छोटे विमान व इतर कोणतीही वस्तू उडवण्यास मज्जाव केला आहे. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव पॅरा- ग्लाइडर्स, पॅरा-मोटार, हँग ग्लाइडर्स, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राप्ट, हाॅट एअर बलून, लहान पाॅवर एअरक्राफ्ट यासारख्या हवाई उड्डाणाला परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.