गणेशोत्सवासाठी कोकणात २१ ऑगस्टपर्यंत जाता येणार आहे. १२ ऑगस्टनंतर एसटीची वाहतुक बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचेही एसटी महामंडळाने स्पष्ट केले. १३ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंतच्या प्रवासासाठी करोनाची चाचणी करणे बंधनकारक आहे. करोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाल्यास प्रवासाची मुभा असेल, असे महामंडळाने स्पष्ट केले.

यासाठी बसगाडय़ा १० ऑगस्टपासून आरक्षणासाठी उपलब्ध केल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या विभागासह राज्यातील अन्य  प्रमुख बसस्थानकावर बस असतील.  प्रवासासाठी  स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही, असे महामंडळाकडून सांगण्यात आले. ६ ऑगस्टपासून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्यांसाठी एसटीने बसेस सुरु केल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.