राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तब्बल २५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकले. शनिवारी संध्याकाळी चर्चगेट येथील त्यांच्या खासगी कार्यालयाच्या इमारतीत ही घटना घडली. अग्निशमन दलाने लिफ्टमधून त्यांची सुटका केली.
चर्चगेट येथील सीसीआयसमोरील रवींद्र मेन्शन या इमारतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले नवीन खासगी कार्यालय सुरू केले आहे. शनिवारी संध्याकाळी ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील कार्यक्रम संपवून काँग्रेसचे सरचिटणीस संजय दत्त यांच्यासमवेत कार्यालयात परत
आले.
लिफ्ट लहान असल्याने केवळ दत्त आणि चव्हाण असे दोघेच त्यात जाऊ शकले. चव्हाण यांचे सुरक्षारक्षक लिफ्टच्या बाहेर थांबले. लिफ्ट थोडी वर जाऊन अडकली. बराच वेळ प्रयत्न करूनही ती उघडली नाही. शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत हवा आत जाण्यासाठी मधली फट थोडी उघडण्यात आली होती. पंचवीस मिनिटांनी पृथ्वीराज चव्हाण आणि संजय दत्त यांची सुटका करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2014 रोजी प्रकाशित
पृथ्वीराज चव्हाण लिफ्टमध्ये अडकले
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तब्बल २५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकले. शनिवारी संध्याकाळी चर्चगेट येथील त्यांच्या खासगी कार्यालयाच्या इमारतीत ही घटना घडली.
First published on: 23-11-2014 at 04:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former cm prithviraj chavan gets locked inside lift