मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी पनवेलमधील माजी महापौर जगदीश गायकवाड यांना सोमवारी अटक केली. जगदीश गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल नगरपालिकेतील माजी महापौर जगदीश गायकवाड यांनी  काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गायकवाड सोमवारी चुनाभट्टी परिसरात होते. त्यावेळी वंचितच्या कार्यकर्त्याने त्यांना रस्त्यात गाठले. यावेळी दोघांमध्ये बचाबाची झाली. त्यानंतर गायकवाड यांनी या कार्यकर्त्याला मारहाण केली. कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली. गायकवाड यांनी यावेळी आपल्याला बंदुक दाखवून धमकावल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केला असून याबाबत तपास करण्यात येत असल्याचे चुनाभट्टी पोलिसांनी सांगितले.

More Stories onमुंबईMumbai
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mayor jagdish gaikwad of panvel arrested mumbai print news ysh
First published on: 24-01-2023 at 16:11 IST