लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: चेंबूरमध्ये शनिवारी मध्यरात्री भरधाव वेगात असलेल्या एका तरुणीच्या मोटारगाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात चारजण जखम झाले असून त्यांना चेंबूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आणखी वाचा-रेल्वे स्थानकांवर ‘पॅनिक बटन’सह सीसीटीव्ही कॅमेरे; भायखळय़ातून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना चेंबूरच्या डायमंड उद्यान परिसरात घडली. चेंबूर परिसरात राहणारे जैस्वाल कुटुंब एक कौटुंबिक कार्यक्रम आटपुन घरी परतत असताना डायमंड उद्यान सिग्नलवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मोटरगाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये तीन लहान मुलांसह चारजण जखम झाले असून त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी नागरिकांनी गाडी चालवणाऱ्या तरुणीला पकडून चेंबूर पोलिसांच्या स्वाधीन केले असून तरुणी नशेत होती, असा आरोप जैस्वाल कुटुंबियांनी केला आहे. सध्या चेंबूर पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.