केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना आज (रविवार) दुपारी घडली आहे. हे पर्यटक नालासोपारा येथील होते. आज दुपारी दोन-अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा शोध सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्या आल्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढली आहे. केळवा पोलीस ठाणे हद्दीतील दादरा पाडा समुद्र किनारी संतोष भुवन नालासोपारा पूर्व येथील गौरव भिकाजी सावंत (वय १७), संकेत सचिन जोगले (१७), देविदास रमेश जाधव (१६), दिपक परशुराम चलवादी (२०), दिपेश दिलीप पेडणेकर (१७), श्रीतेज नाईक (१५), तुषार चिपटे (१५) ही ७ मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारी अडीचच्या सुमारास हे सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी गेले.  यातील चार जण बुडाले. यातील दिपक चलवादीचा मृतदेह सापडला आहे. तर दिपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक आणि तुषार चिपटे यांना शोधण्याचे काम सुरू आहे. पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four tourists drown in palghar kelve sea one dead body found
First published on: 17-06-2018 at 17:33 IST