लोअर परळ येथे १५ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाला असून याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील तीन मुलांना पोलिसांनी अटक केली असून ३ अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींपैकी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला असून उर्वरित आरोपींनी त्यांना मदत केल्याचा आरोप आहे.

वरळी येथील १५ वर्षांच्या तक्रारदार मुलीचे १६ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. गुरूवारी पीडित मुलगी वरळीतील जांबोरी मैदान परिसरात फिरत होती. तेथून घरी जात असताना मुलीचा प्रियकर व त्याचा मित्र दुचाकीवरून तेथे आले. त्यावेळी आरोपी प्रियकराने तिला सोबत येण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकीवर बसवून आरोपीने पीडित मुलीला त्याच्या मित्राच्या खोलीवर नेले. खोलीचा मालक मित्र व पीडित मुलीच्या प्रियकराने पोटमाळ्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी खोलीमध्ये त्याचे इतर चार मित्रही उपस्थित होते. त्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात मुलीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सामुहिक बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून शुक्रवारी सायंकाळी तीन आरोपींना अटक केली. त्यापैकी दोन आरोपी १८ वर्षे व एक आरोपी १९ वर्षांचा आहे. उर्वरित दोन आरोपी १६ वर्षे, तर एक आरोपी १७ वर्षे ७ महिन्यांचा आहे. अल्पववयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.