चार साथीदारांना पकडण्यातही विशेष पोलीस पथकाला यश
कुख्यात गुंड अश्विन नाईक व त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. दादर येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून ५० लाख रुपयांची खंडणी वसूल करतानाही ही कारवाई करण्यात आली.
दादर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला अष्टिद्धr(२२४)वन नाईक यांच्या साथीदाराने नुकतीच मारण्याची धमकी दिली. याचबरोबर त्याच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी व नवीन इमारतीमध्ये सहा हजार चौरस फूटांची जागाही मागितली. अश्विन नाईक याने यापूर्वी या बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीच्या भागीदाराकडून २५ लाख रुपये वसूल केले होते. यानंतरही नाईकच्या टोळीने पुन्हा त्याच्याकडून खंडणी मागितली. ही रक्कम देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने वेळ मागून घेतला. यानंतर त्या व्यावसायिकाने दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. बांधकाम व्यावसायिकाने अश्विन नाईक व त्याचे साथीदार ही रक्कम घेण्यासाठी रविवारी भवानी शंकर रोडवर येणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार विशेष पथक तयार करून सापळा लावण्यात आला. अश्विन नाईक स्वत: व त्याचे चार साथीदार दोन इनोव्हा कारमधून खंडणीची रक्कम वसूल करण्यासाठी दादर येथे भवानी शंकर रोडवर आले. नाईकने खंडणीची रक्कम घेतल्यानंतर पोलिसांनी त्यास व त्याच्या साथीदारांना पकडले. अश्विन नाईक याच्यासोबत त्याचे साथीदार प्रमोद केळुस्कर, जनार्दन सकपाळ, प्रथमेश परब, राजेश तांबे यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2015 रोजी प्रकाशित
कुख्यात गुंड अश्विन नाईक अटकेत
कुख्यात गुंड अश्विन नाईक व त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
Written by मंदार गुरव

First published on: 21-12-2015 at 02:25 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangster ashwin naik arrested by police