तरूणाच्या छेडछाडीला कंटाळून वडाळा येथील एस.आय.डब्लू.एस महाविद्यालयातील मुथू सालवी या १७ वर्षीय विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ बुधवारी विष पिऊन आत्महतेचा प्रयत्न केला. यानंतर तिला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे रविवारी तिचा मृत्यू झाला. मैत्रिणीच्या ओळखीने धारावी येथे राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाशी तिची ओळख झाली होती. यानंतर तो सतत तिच्या मागावर असायचा व तिला त्रास द्यायचा. बुधवारी तो तरुण तिच्या महाविद्यालयाजवळ आला त्यावेळेस तिने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळेस त्या तरुणाने तिला तातडीने सायन रुग्णालयात नेले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असताना रविवारी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, हा युवक तिला मारहाण करीत असे. तसेच तिच्याकडील सोन्याचे दागिने त्याने घेतल्याचे आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केले आहेत. मुथू ही महाविद्यालयात अकरावीत शिकत होती. तिच्या घरचे वातावरण हालाखीचे असून गेल्या दोन वर्षांत तिच्या दोन मोठय़ा भावांचा आजारपणात मृत्यू झाला होता. त्यामुळे एकुलती एक मुलगी गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2015 रोजी प्रकाशित
विद्यार्थिनीची आत्महत्या
यानंतर तिला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे रविवारी तिचा मृत्यू झाला.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 14-12-2015 at 00:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl student suicide