scorecardresearch

Premium

मुंबई : छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक, २९ वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी

सशस्त्र दरोड्याच्या २९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत सहभागी असलेल्या छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

Goon of Chota Rajan gang
मुंबई : छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक, २९ वर्षांपूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : सशस्त्र दरोड्याच्या २९ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेत सहभागी असलेल्या छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आरोपीविरोधात मुंबई व गुजरातमध्ये १० गुन्ह्यांची नोंद आहे.

चेंबूर, सिंधी कॅम्प येथील एका इस्टेट एजंटच्या दुकानात अटक आरोपी साकीर बरकत अली लखानी (५९) व त्याचे छोटा राजन टोळीतील चार साथीदार यांनी घातक शस्त्रांद्वारे १९९४ मध्ये दरोडा टाकला होता. त्यांना अडवण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावरही त्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने भादंवि कलम ३९९, ३०७, ३५३, ४०२ व भारतीय हत्यार कायदा कलम २७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी लखानीला अटक झाली होती. सत्र न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. परंतु अटक आरोपीचे इतर ३ साथीदार हे पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर लखानी हा फरार झाला होता. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट काढले होते. याप्रकरणी तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी तपास केला असता आरोपी गुजरातमधील सूरत येथे लपला असल्याचे निष्पन्न झाले. कक्ष ५ च्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुजरातला जाऊन पाहणी केली असता आरोपी ओळख लपवून राहत असल्याचे समजले. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले.

combative attitude of Sikh community
चाहे हंजूगॅस बरसाओ, या गोळीया… शेतकरी आंदोलनात ‘जट्ट दा जुगाड’
Koyta gang in police trap
पुणे : ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमुळे कोयता गॅंग पोलिसांच्या जाळ्यात
Chandrapur, Murder Case, Friend Killed, Buried, dumping yard, five arrested,
चंद्रपूर : मित्राची हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरला, पाच मित्र पोलिसांच्या ताब्यात
Jewelery looted fake police Sangli district
सांगली : तोतया पोलिसाकडून सव्वा लाखाच्या दागिन्यांची लूट

हेही वाचा – सीमा हैदर आणि २५ जण पाकिस्तानातून आले आहेत, मुंबई पोलिसांना दूरध्वनी, संशयीत ताब्यात

हेही वाचा – रामलीला आयोजित करणाऱ्या संस्थांना परवानगीसाठी एक खिडकी, मैदानाचे भाडे निम्म्यावर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश

लखानी विरोधात मुंबई व गुजरात येथे दरोडा, जबरी चोरी, मोटार वाहन चोरी व फसवणुकीचे असे एकूण १० गुन्हे नोंद आहेत. तसेच गुजरात येथील ओधव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल असून त्याची फरार आरोपी म्हणून नोंद आहे. आरोपी त्यावेळी अ‍ॅन्टॉपहिल परिसरात राहत होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goon of chota rajan gang arrested involved in robbery crime 29 years ago mumbai print news ssb

First published on: 07-10-2023 at 14:04 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×