मंगळवारी सकाळी दिल्ली येथे कार अपघातात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर संध्याकाळी त्यांचं पार्थिव विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आलं. सर्वप्रथम ते त्याच्या वरळी येथील पूर्णा या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. तेथे विविध पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांनी त्यांनी श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर रात्री साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचं पार्थिव नरिमन पॉंईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन घेता यावं म्हणून ठेवण्यात आलं आहे.