Sion Fort History: सोयरिक जुळलेले पोर्तुगीज उत्तरेकडे, दक्षिणेकडे अलीबागच्या पलीकडे जंजिऱ्याचा सिद्धी आणि मधल्या भागात मराठ्यांची प्रबळ सत्ता आणि या तिघांचेही लक्ष लागून राहिले होते ते मुंबई बेटाकडे… अशा कचाट्यात इंग्रज सापडले होते. त्यामुळे सर्व बाजूंवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना उंचावरची जागा आवश्यक होती. शीवची टेकडी ही आजही मुंबईतील सर्वाधिक उंचीवरची जागा आहे. साहजिकच त्यांनी इथे शीवच्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि नंतर वेळोवेळी डागडुजीही केली.
१७३० साली इथे असलेल्या सैनिकांनी सोयीसुविधांबद्दल तक्रार केली; त्यावेळेस नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारसीनंतर येथील सुविधेसाठी इंग्रजांनी तब्बल ५०० रुपये (आताचे एक कोटी रुपये) मंजूर केले. यावरून या किल्ल्याचे इंग्रजांच्या लेखी असलेले तत्कालीन महत्त्व पुरते स्पष्ट होते. कशी आहे नेमकी या किल्ल्याची रचना, जाणून घेऊया…
मुंबईतील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेण्यासाठी गोष्ट मुंबईची ही मालिका आमच्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता.