मनोहर गोडसे हे मुळचे पेणजवळच्या वरसई या खेडेगावातील आहेत. बालपणापासून बॅडमिंटनची आवड होतीच, पुढे यामध्येच त्यांनी आपलं करिअर केलं. राज्यस्तरीय टुर्नामेंट गाजवल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी ४ रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. वयाच्या ३५व्या वर्षी त्यांनी लहान मुलांना बॅडमिंटन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ज्या खेळाने आपल्याला ओळख दिली त्याच खेळासाठी काहीतरी करावं हा त्यांचा विचार होता. तरुण पिढीला बॅडमिंटनच्या क्षेत्रात स्वतःला घडवायचं असेल, तर त्याचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. या उद्देशाना गोडसे यांनी १९९७ साली वयाच्या ५६व्या वर्षी ‘मनोरा’ ही बॅडमिंटन अकॅडमी स्थापन केली.

या माध्यमातून त्यांनी मुंबईतील नऊ ते १८ वर्षांखालील मुला, मुलींसाठी स्पर्धांचं आयोजन सुरू केलं. आता राज्यभरातील मुलं, मुलीही त्यात जोडले गेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे १९९७ पासून अकॅडमीचं मेंबरशिप शुल्क हे आजही अवघं ५१ रुपये इतकंच आहे. आतापर्यंत त्यांनी शंभरहून अधिक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या संपूर्ण प्रवासात मनोरह यांच्या पत्नी माधवी आणि मुलगा जयंत गोडसे यांची त्यांना खंबीर साथ मिळाली. ‘मनोरा’च्या स्पर्धेत खेळलेली मुलं-मुली आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार कामगिरी करत आहेत. विशेष म्हणजे वयाच्या ८३व्या वर्षीही मनोहर गोडसे यांचा संघटक म्हणून उत्साह तरुणांसाठी आदर्श ठरणारा आहे.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Three major announcements for RBI customers investors
रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक, गुंतवणूकदारांसाठी तीन प्रमुख घोषणा
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…