‘फेटा’ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. अनेक सांस्कृतिक किंवा लग्न सोहळ्यांमध्ये हमखास याची मागणी असते. मात्र, फेटा बांधणं हे नुसतं एक काम नसून तर ती एक कला आहे. आणि या कलेचं व्यवसायात रुपांतर करू शकतो हे मुंबईतील गिरगावमध्ये राहणाऱ्या निहार तांबडे या तरुणाने दाखवून दिलं आहे. घरची हालाकीची परिस्थिती असताना अंगावार पडेल ते काम निहारने केलं.
त्यानंतर मित्राच्या साथीने त्याने फेटे बांधण्याची कला अवगत केली आणि तेथून पुढे या प्रवासाला सुरूवात झाली. नववी पासूनच निहारला या कामाची आवड होती. त्याच्या याच कलेच्या जोरावर त्याने २०१९ मध्ये मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं. त्यानंतर अनेक मालिका, चित्रपटांत बांधलेले अचूक फेटे हा त्याचा युएसपी ठरला.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.