मुंबई : सर्वाधिक २० टक्के रोजगार देणाऱ्या बांधकाम क्षेत्राला क्षेत्राला चालना देण्यासाठी काही सवलती देण्याचा विचार सुरू असून राज्य सरकार लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (‘नरेडको’) ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२२’ या मालमत्ताविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने मेट्रो, मुंबई पारबंदर प्रकल्प, सागरी मार्ग असे अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. पुढील वर्षी मेट्रो प्रकल्पातील काही मेट्रो मार्गिका सुरू होतील. तर मुंबई पारबंदरसह इतर ही प्रकल्प सुरू होतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबईत ‘नैना’ प्रकल्प सुरू असून या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे. तिसरी मुंबई म्हणून हा परिसर ओळखला जाईल. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पामुळे येथील मालमत्तांच्या किंमती कमी होतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथील ‘नरेडको’ आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख, महाराष्ट्र ‘नरेडको’चे अध्यक्ष संदीप रूणवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांच्या उद्घाटन हस्ते झाले.