या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुद्धिबळ या खेळातील महाराष्ट्राचे पहिले आणि देशातील तिसरे ग्रँडमास्टर, माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदचे समकालीन आणि विख्यात बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांच्याशी ‘लोकसत्ता सहज बोलता.. बोलता’ या नव्या वेब उपक्रमात संवाद साधण्याची संधी वाचकांना मिळणार आहे. खेळाडूबरोबरच लोकप्रिय बुद्धिबळ विश्लेषकही असलेले प्रवीण ठिपसे बुद्धिबळातील अनेक बदलत्या प्रवाहांचाही वेध घेतील. या उपक्रमाचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी असून, येत्या शुक्रवारी २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता तो आयोजित करण्यात आला आहे. करोनामुळे इतर सर्वच खेळ बंद असताना, बुद्धिबळाच्या अनेक ऑनलाइन स्पर्धा अव्याहत सुरू आहेत. ऑनलाइन स्वरूपामुळे मोठय़ा प्रमाणावर तरुणाई या खेळाकडे आकर्षित होत आहे.  गेल्या तीन दशकांमध्ये या खेळात झालेल्या विविध बदलांचा आणि व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा या वेबसंवादात घेतला जाईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grandmaster praveen thipse in loksatta sahaj bolta bolta abn
First published on: 26-05-2020 at 00:36 IST