केस कापताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील सलूनमध्ये काम करणाऱ्या एका १९ वर्षीय हेअर स्टायलिस्टला अटक करण्यात आली आहे. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अल्ताफ सलमानीला रविवारी व्हीपीरोड पोलिसांनी अटक केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
फेशिअल आणि हेअर स्ट्रेटनिंगसाठी मी सलूनमध्ये गेले होते. फेशिअल केल्यानंतर सलमानीने माझे केस धुतले. केस धुत असताना त्याने जास्त पाणी ओतले. त्यामुळे माझे टी-शर्ट ओले झाले असे महिलेने पोलिसांना सांगितले.
सलमानी त्या महिलेला दुसरे टी-शर्ट द्यायला तयार होता. पण त्या महिलेने नकार दिला. केस आणि टी-शर्ट सुकवण्याच्या नावाखाली आरोपीने आपल्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला असा महिलेचा आरोप आहे.
