हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून, वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
आज सकाळी आठच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील लोकल अर्धा तास उशिराने धावत होत्या. रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिग्नलची वायर चोरीला गेल्याने या मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याचे समजते.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.