हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. हार्बर मार्गावरील लोकल सध्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर-सीएसएमटी लोकल सँडहर्स्ट रोड स्टेशनवर पोहोचताच पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट झाला. अचानक पाऊस सुरू झाल्याने झाल्याने शॉर्ट सर्किट झाल्याचं कळत आहे. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर ट्रेनच्या काही डब्यांमध्ये धूर पसरला होता. यानंतर घाबरलेले प्रवाशी लोकलमधून खाली उतरुन प्लॅटफॉर्मवर आले. हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु असल्याने प्रशासनाकडून सर्व प्रवाशांना मध्य रेल्वेने प्रवास करत सीएसएमटीला जाण्यास सांगण्यात आलं आहे.



