विकास प्रकल्पाच्या आड येणाऱ्यांच्या नावाखाली घरे बांधून द्यायची आणि त्याबदल्यात विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) मिळवायचा, असा धंदाच काही बडय़ा विकासकांनी सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने ‘हाऊसिंग डेव्हलेपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि.’ (एचडीआयएल) या बडय़ा विकासकाने चेंबूर-माहुल येथील वाशी नाका परिसरात प्रकल्पबाधितांसाठी अनेक इमारती बांधून रग्गड टीडीआर मिळविला. यापैकी अनेक इमारती सध्या ओस असून गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. खरोखरच इतक्या प्रकल्पबाधित घरांची आवश्यकता नव्हती तर केवळ विकासकाच्या तुंबडय़ा भरण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) वा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने या इमारती बांधून घेतल्या नाहीत ना, अशी शंका निर्माण झाली आहे.
मुंबईत सध्या विकासाची कामे जोरात सुरू असून या विकासाआड येणाऱ्यांना प्रकल्पबाधित संबोधले जाते. या प्रकल्पबाधितांसाठी एमएमआरडीए तसेच झोपु प्राधिकरणाकडून इमारती बांधल्या जातात. चेंबूर-वाशीनाका येथे झोपु प्राधिकरणाने एचडीआयएल, आरएनए यांच्याकडून अशा इमारती बांधून घेतल्या आहेत. या इमारती नंतर एमएमआरडीए, जिल्हाधिकारी तसेच पालिकेला प्रकल्पाबाधितांसाठी सुपूर्द केल्या आहेत.
वाशी नाका येथील इमारती झोपु प्राधिकरणाने एचडीआयएलकडून बांधून घेतल्या आहेत. आम्हाला हवी होती तितकी घरे आम्ही घेतली. उर्वरित ओस पडलेल्या इमारतींशी आमचा संबंध नाही. झोपु प्राधिकरणाची ती जबाबदारी आहे.
ए. आर. वानखेडे, उपायुक्त, एमएमआरडीए
या इमारतींबाबत ‘एचडीआयएल’च्या जनसंपर्क विभागाच्या विद्या मोरजकर यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित अधिकारी उपलब्ध नाहीत, त्यामुळे माहिती मिळू शकली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jun 2014 रोजी प्रकाशित
‘एचडीआयएल’च्या फायद्यासाठी प्राधिकरणांना प्रकल्पबाधा!
विकास प्रकल्पाच्या आड येणाऱ्यांच्या नावाखाली घरे बांधून द्यायची आणि त्याबदल्यात विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) मिळवायचा, असा धंदाच काही बडय़ा विकासकांनी सुरू केला आहे.
First published on: 08-06-2014 at 02:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hdil seeks tdr