‘नीट’ सक्ती वर्षभर लांबणीवर टाकण्यात यशस्वी झाल्याचे श्रेय घेऊन आनंदात मश्गुल असणाऱ्या राज्य सरकारला केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्या विधानामुळे तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने यंदा ‘नीट’ रद्द केलेली नाही, गैरसमज करुन घेऊ नका’ असे जे.पी.नड्डा यांनी शनिवारी सांगितले. ‘नीट’ची परीक्षा वर्षभर पुढे ढकलण्यासाठी केंद्र सरकार अध्यादेश काढणार असल्याचा निर्णय काल जाहीर करण्यात आला होता. या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आनंद साजरा करत केक कापून सेलिब्रेशन केले होते. या माध्यमातून तावडे आणि फडणवीसांनी ‘करून दाखविले’ची टिमकी वाजवली होती. अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयाबद्दल तावडे आणि फडणवीसांचे आभारही मानले होते. मात्र, आता नड्डा यांच्या विधानामुळे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांची चांगलीच पंचाईत होणार आहे.


‘नीट’नाटकाचा गोंधळ सुरूच! 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.