‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे कारशेडविरोधातील याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. आरे कारशेडच्या कामासाठी येथील ८४ झाडे कापण्यासाठी परवानगी द्यावी, तसे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणास द्यावेत अशी विनंती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) काही दिवसांपूर्वी एका प्रतिज्ञापत्राद्वारे केली होती. बुधवारी एमएमआरसीने यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आज (गुरुवारी) सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.

हेही वाचा- सागरी मार्गाच्या कामामुळे तारापोरवाला मत्स्यालयाला धक्का; इमारत रिकामी करण्याचे मत्स्य व्यवसायमंत्र्यांचे आदेश

कारशेडमधील ८४ झाडे कापण्यास परवानगी देण्याच्या एमएमआरसीच्या मागणीला सर्वच याचिकाकर्त्यांनी जोरदार विरोध केला आहे. या ८४ झाडांपैकी ३९ झाडे ही आदिवासीची असून यात पपई, केळी आणि इतर फळांची झाडे आहेत. या झाडांची फळे विकून आदिवासी बांधव आपला उदरनिर्वाह करीत आहेत, असा दावा करीत याचिकाकर्त्या अमृता भट्टाचार्य यांनी झाडे कापण्याच्या एमएमआरसीच्या मागणीला जोरदार विरोध केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- मुंबईत गोवरचा १२ वा मृत्यू; गोवरचे १३ नवे तर १५६ संशयित रुग्ण आढळले

दरम्यान,, ‘मेट्रो ३’ प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग दिला नाही तर त्याचा खर्च वाढत जाईल, असा दावा करीत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.