लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांत उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईतील तापमानात बुधवारी झालेली वाढ गुरुवारीही कायम होती. त्यामुळे नागरिकांना असह्य उकाडा सोसावा लागत आहे. तसेच गुरुवारी दुपारनंतर काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Mumbai Heavy Rainfall Alert Today in Marathi
Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत पुढील तीन चार तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज
average rainfall , Mumbai,
मुंबईत आतापर्यंत सरासरीच्या ४५ टक्के पाऊस, गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस
Chance of heavy rain in Mumbai today Mumbai
मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता
Heavy rain, forecast, Mumbai,
मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज
mumbai rain alert marathi news
मुंबई आणि उपनगरांत मध्यम पावसाचा इशारा
Light to moderate rain forecast in Mumbai throughout the day Mumbai print news
मुंबईत दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज
Mumbai, High tide, sea,
मुंबई : आज दुपारी समुद्राला मोठी भरती, सुमारे चार मीटरपर्यंत लाटा उसळणार
Thane, Railway, disrupted, heavy rain,
ठाणे : मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, लोकल गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने

आर्द्रतेमुळे घाम येऊन मुंबईकरांना बुधवारी त्रास झाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३७.६ तर, सांताक्रूझ केंद्रात ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने, तसेच वारे खंडित झाल्याने हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पावसाच्या शिडकाव्यामुळे तापमानात फारसा फरक पडणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-घाटकोपर दुर्घटना : तीन दिवसानंतर मदतकार्य स्थगित, १६ जणांचा मृत्यू

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्मा जाणवेल. तसेच ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील आणि हलका पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नाशिक, जळगाव आणि सांगली, सातारा भागात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.