मुंबई/पुणे : आगामी चार दिवस कोकणासह पश्चिाम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणीच मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार असला तरी रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. चार दिवसांनंतर ऑगस्टच्या सुरुवातीला या पाचही जिल्ह्यांमधील पाऊस कमी होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

गेल्या २४ तासांमध्ये कोकणामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकणासह विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार, तर मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जेमतेम पाऊस झाला. मराठवाड्यामध्ये पुढील काही दिवस तुरळक सरींची शक्यता असून, विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.