मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण किनारपट्टीवरही अशीच स्थिती असेल.

मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता ( संग्रहीत छायाचित्र )

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात १८ जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पाऊस धारा कोसळतील, असे भाकीत हवामान विभागाने केले आहे.

अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्रात वेगाने येत आहेत. त्यामुळे कोकणात आणि घाट भागात पावसाचा जोर अधिक राहील. राज्यभरात १८ जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होणार असून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण किनारपट्टीवरही अशीच स्थिती असेल. उंच लाटा आणि खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत कुलाबा येथे ९.४ मि. मी., तर सांताक्रूझ येथे ३.८ मि. मी. पावसाची नोंद झाली. १ ते १७ जून या काळात कुलाबा येथे १२९.७ मि. मी., तर सांताक्रूझ येथे ९८.१ मि. मी. पावसाची नोंद झाली.

मराठीतील सर्व मुंबई न्यूज ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rain prediction on 19th june in mumbai by meteorological department mumbai print news asj

Next Story
सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे पश्चिम उपनगरीय रेल्वे विलंबाने
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी