मुंबई : मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून धरणातील पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मात्र असे असताना मुंबईत मात्र येत्या १ जुलैपासून पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणांतील पाणीसाठा खालावल्यामुळे मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव जलविभागाने मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याचे समजते.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत राखीव साठा मिळून सध्या १२.५७ टक्के पाणीसाठा जमा आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असून आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीतही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मात्र जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा खूपच खालावला होता. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव जलविभागाने आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबईसह इतर जिल्ह्यांना पुढील तीन-चार तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत मिळून सध्या राखीव साठ्यासह १२.५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सातही धरणांत १ लाख ५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तर ऊर्ध्व वैतरणा धरणातून ७५ हजार दशलक्ष लिटर आणि भातसा धरणातून ७५ हजार दशलक्ष लिटर असे एक लाख ५० हजार दशलक्ष लिटर अधिक पाणी मिळणार आहे. त्यामुळे २ लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे.

सातही धरणातील पाणीसाठा …..१ लाख ५ हजार १०९ दशलक्ष लिटर…….७.२६ टक्के

राखीव साठा…….१ लाख ५० हजार दशलक्ष लिटर …..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण पाणीसाठा ….२ लाख  ७२१ दशलक्ष लिटर ……..१२.५७ टक्के