राजकारणात मोठय़ा नेत्यांची मुले-नातेवाईक आमदार होण्याची परंपरा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली. राज्याचे राजकारण गाजवणाऱ्या ठाकरे, पवार, देशमुख कुटुंबातील पुढच्या पीढीने विधानसभेत पहिले पाऊल टाकले असून, त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे धाकटे पुत्र धीरज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे, पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान, माजी खासदार विठ्ठलराव तुपे यांचा मुलगा चेतन तुपे, माजी मंत्री दत्ता राणे यांचा मुलगा सुनील राणे, माजी मंत्री विमल मुंदडा यांची सून नमिता मुंदडा, माजी मंत्री सुरूपसिंह नाईक यांचा मुलगा शिरीष नाईक, माजी आमदार चंदूकाका जगताप यांचा मुलगा संजय जगताप, चंद्रपूरचे विद्यमान खासदार सुरेश धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर, माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील, माजी खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे, जळगाव घरकूल घोटाळ्यात तुरुंगवास झालेले शिवसेना आमदार चंद्रकांत सोनावणे यांची पत्नी लता, माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र राहुल, भाजप आमदार अरुण अडसड यांचे पुत्र प्रताप, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची मुलगी मेघना, माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील, भाजपचे माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी, राष्ट्रवादीचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे पुत्र अतुल, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू सुनील, माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे पुत्र प्राजक्त, मावळते मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप, माजी खासदार गोविंदराव निकम यांचे पुत्र शेखर, माजी आमदार नरसिंह पाटील यांचे पुत्र राजेश यांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2019 रोजी प्रकाशित
विधानसभेतील नवी घराणेशाही
राजकारणात मोठय़ा नेत्यांची मुले-नातेवाईक आमदार होण्याची परंपरा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 26-10-2019 at 00:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hereditary politics in vidhan sabha maharashtra assembly elections zws